माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
राखण करते मी रावजी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
राखण करते मी रावजी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
राखण करते मी रावजी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं ग
चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं ग
काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी
नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी
फुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरी
फुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
वांगी तोडते मी रावजी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
गोर्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग
अंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू ग
पदर राहिना खांद्यावरी पिसाट वारं भरलं उरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी
शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
वांगी तोडते मी रावजी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
Maalachya Malyamadhi Kon Ga Ubhi was written by .
Maalachya Malyamadhi Kon Ga Ubhi was produced by .
Usha-mangeshkar released Maalachya Malyamadhi Kon Ga Ubhi on Wed Dec 01 1971.