[Intro]
यमुनेच्या काठी निघाल्या
गवळणी साऱ्या पाण्याला
अन् म्हणती सांग यसोदे
काय करावं कान्ह्याला?
घागरी फोडून जातुया
दही-दूध चोरून खातुया
यसोदे आवर त्याला
घोर जीवाला फार
[Verse]
ग्वाड लय बोलून छळतोया
द्वाड लय छेडून पळतोया
सावळा पोरं तुझा हा
रोज करी बेजार
त्याला समजावून झालं
कैकदा कावून झालं
तुझी नाही धडकत आता
इकडं राहू नको
[Chorus]
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
[Verse]
सये, पाखरू रानाचं देतंया संगावा
वाट माहेराची साद घालते
सये, दाटते-दाटते पंचमी सणाला
गंगा-यमुना गं डोळी नाचते
नागपंचमीचा आला सण
पुन्याईचं मागू धन
किरपा तूझी आम्हावर राहू दे
आज वाण हिरव्या चुड्यानं
कुकवाचं मागू लेण
औक्ष धन्या लेकराला लागू दे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ दे साथ सुखाची
आड बाजुला लप जा
तोंड बी दावू नको
[Chorus]
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना
गाऊ नको, गाऊ नको ना
[Verse]
गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी
गोकुळात रंग खेळतो, रंग-रंग खेळतो श्रीहरी
गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधिका, दंग राधिका भाबडी
लावीतो लळा, श्याम सावळा
लागला तुझा रंग हा निळा
सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या जीव गुंतला
सोडवू कसा रे सांग मोहना?
जीव-प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा
सोडून गोकुळ, कान्हा, जाऊ नको
[Chorus]
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
जाऊ नको रे, जाऊ नको जाऊ किसना
जाऊ नको, जाऊ नको ना
Gau Nako Kisna was written by Guru Thakur.
Gau Nako Kisna was produced by Ajay-Atul.
Ajay-Atul released Gau Nako Kisna on Sat Apr 29 2023.